
शिवाजी विद्यापीठचा टेबल टेनिस संघ जाहीर*
राजीव गांधी प्रादयोगीकी विश्वविद्यालय, भोपाळ येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी टेबल टेनिस स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ जाहीर झाला. या स्पर्धा दिनांक २० ते २४ डिसेंबर रोजी होणार आहेत. या टीम मध्ये ऋषिकेश नलवडे-कर्णधार, प्रतीक जाधव, वेदांत तांबे, साईनाथ खरे व सुमंतू साळुंखे यांची निवड करण्यात आली. तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. आर. एस. पवार यांची निवड झाली.
या सर्वांना डॉ. शरद बनसोडे क्रीडा व शारीरिक शिक्षक संचालक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व डॉ. सुरेश धुरी यांनी शुभेच्छा दिल्या.
Tags:
Share Post

